करमाळाकृषी

शेतकऱ्यांचे कृषी पंपाची तोडणी करण्याचा आदेश.. ही मुख्यमंत्र्याचे वाढदिवसाची भेट समजावी का?—-ॲड अजित विघ्ने

करमाळा प्रतिनिधी- राज्यातील शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करणेबाबतचा आदेश आलेवरून महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने विविध भागातील शेतकऱ्यांचे वीजेचे कनेक्शन तोडण्याची मोहीम चालु केली आहे. सत्तेत येण्यापुर्वी विज मोफत देण्याचे घोषणा होतात. थकीत विज बिलांची संपुर्ण माफी करण्याबाबत आश्वासित केले जाते. मात्र खुर्ची मिळाली की सर्वांना शेतकऱ्यांचा विसर पडतो. विद्यमान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देखिल त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याचे दिसत असुन, राज्याचे मुख्यमंत्री यांचा वाढदिवस आज साजरा होत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना मात्र विज तोडणीमुळे शॉक बसला आहे. एकीकडे रेग्युलर कर्ज भरणा करणाऱ्या शेतकर्‍याना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा होते, प्रत्यक्षात मात्र ठराविक शेतकऱ्यांना फक्त लाभ मिळतोय, त्यामुळे सरसकट रेग्युलर कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्याबाबत दुजाभाव दाखविण्याचे काम सरकार कडुन होत असुन, संभाजीनगर( औरंगाबाद) हाय कोर्टाने मागिल कृषी कर्ज माफी मधुन वंचित राहणाऱ्या शेतकऱ्याना देखिल कर्ज माफी देणेबाबतचा आदेश केला आहे, त्याचेकडे देखिल हे सरकार जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असुन, याबाबत तातडीने निर्णय होवुन शेतकऱ्यांचे शेती पंपाची तोडणी तात्काळ थांबवावी व इतर मागण्यांचे निवेदन ॲड. अजित विघ्ने, वाशिंबेचे नुतन सरपंच तानाजी बापु झोळ यांनी मुख्यमंत्री यांना पाठवले आहे. वस्तुतः शेतकरी वर्गामधुन संपुर्ण विज बिल माफी द्यावी याबाबत वारंवार मागणी केली जात असुन, विज तोडणी मुळे शेतकऱ्यांकडुन संताप व्यक्त करण्यात येत आहे.
*सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडु नये. अशी आमची सर्व सामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांची मागणी असुन.. मुख्यमंत्र्यांचे वाढदिवसाचे दिवशीच वीज तोडणी करणे म्हणजे हे शेतकर्यांना दिलेले रिटर्न गिफ्ट समजायचे का? असा माझा सवाल आहे.- सरपंच. तानाजी( बापु) झोळ. वाशिंबे*

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group