छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कमलादेवी ऑप्टिकल आनंदऋषी नेत्रालय यांच्या विद्यमाने नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
करमाळा प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 19 फेब्रुवारी रोजी असलेल्या जयंतीनिमित्त श्री कमलादेवी ऑप्टिकल्स व आनंद ऋषी नेत्रालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर 19 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दोन या कालावधीमध्ये आयोजित केले आहे. सदर शिबिर छत्रपती चौक करमाळा येथे आयोजित केले असून या शिबिराचा सर्व शहर व तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री कमलादेवी ऑप्टिकल्सचे मालक सुरेश चाळक रामानंद चाळक यांनी केले असून नेत्र तपासणी करण्यासाठी 9423535442 या मोबाईल नंबर वर नाव नोंदणी करावव या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
