यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील सन 1976 च्या वाणिज्य विषयाच्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयास भेट.
करमाळा प्रतिनिधी 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 4वा अचानक सन 1976च्या बॅचच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास भेट दिली. हे सर्व विद्यार्थी करमाळ्यात एका कार्यक्रमास एकत्र आले होते. अचानक त्यांना त्यांच्या बॅचचे मा. विलासराव घुमरे सरांची उणिव जाणवली व त्यांना भेटण्यास सर्वांनी महाविद्यालयामध्ये जाण्याचे ठरवले. मा. विलासराव घुमरे सरांनी त्यांचे महाविद्यालयात संस्थेचे सचिव व मित्र या दोन्ही नात्यानी स्वागत व पाहुणचार केला. येथून पुढे त्यांच्या जुन्या गप्पांना उधाण आले. महाविद्यालयाचे बदललेले रुप पाहून सर्वजन भारावून गेले. ज्या वेळी महाविद्यालयाच्या इमारतीतून फेरफटका मारला व सर्व जण आपले जुने किस्से आठवत, वर्गखोल्या आठवत, बसण्याची जागा, ग्रंथालय इत्यादिच्या आठवणींची जणु भरतीच आलेली दिसून आली. महाविद्यालयाचे बदलते रूप पाहून त्यांनी मा. विलासराव घुमरे सरांचे मन भरून कौतुक केले. काळानुरूप केलेला बदल त्यांना मोठ्या शहरातील महाविद्यालया सारखा वाटू लागला. प्राध्यापक कक्ष, संस्था कार्यालय, प्राचार्य कक्ष ,प्रशासकीय कार्यालय, प्रशस्त व आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त बनवलेला हॉल, ग्रंथालयाची रचना पाहून चकित झाले. त्यांच्या काळातील पुस्तके व आजची पुस्तके पाहून तर त्यांचे हात ग्रंथाकडे आपोआप जाऊ लागले व त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची आठवण येऊ लागली. सर्व मित्रांनी मा. घुमरे सरांच्या समवेत वृक्षारोपण करून महाविद्यालयासी आपले नाते पक्के केले. या मध्ये श्री चंद्रशेखर शिलवंत सेवानिवृत्त स्टेट बैंक, श्री प्रकाश विसाळ नॅशनल इंशुरंस पुणे, श्री दिलिपसिंग परदेशी सेवानिवृत्त सहकार खाते, श्री प्रशांत शहा व्यावसायिक इंदापूर, श्री प्रविण देवी
व्यावसायिक करमाळा,श्री अविनाश महाजन सेवानिवृत स्टेट बैंक, श्री कुलभूषण रामनवमिवाले सेवानिवृत्त बँक ऑफ महाराष्ट्र, श्री अभय करंदिकर सेवानिवृत्त IDBI बैंक हे होते. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त केले.
