करमाळा शहरातील संस्कृती प्रतिष्ठानने जपले रसिकांचे मन दहीहांडी उत्सव आनंदात जल्लोषमध्ये साजरा
करमाळा प्रतिनिधी संस्कृती प्रतिष्ठानाची मानाची दहीहंडी फोडण्यास हजारो तरुणांनी सहभाग नोंदवला ,संस्कृती प्रतिष्ठानची मानाची प्रतिष्ठित दहीहंडी महोत्सव वर्ष आठ वे या दहीहंडीचे आयोजन सुभाष चौक मेन रोड करमाळा येथे शुक्रवार दिनांक 19 8 2022 रोजी सायंकाळी पाच ते दहा या वेळेत करण्यात आला यावेळी हजारो तरुणांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला ,दहीहंडी महोत्सव चे प्रमुख आकर्षण त्रिशूल व डमरू ची सजावट व साऊंड सिस्टिम & लाईट डेकोरेशन लावून करण्यात आली होती. यावेळी संस्कृती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रशांत अण्णा ढाळे अतिश दोषी ,लक्ष्मीकांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दहीहंडी माणसाचे आयोजन करण्यात आले होते मान्यवर म्हणून भाजपाचे तालुका अध्यक्ष गणेश भाऊ चिवटे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव , जयराज चिवटे, तालुका सरचिटणीस रामभाऊ ढाणे शहराध्यक्ष जगदीश भैय्या अग्रवाल व्यापारी सेल अध्यक्ष जितेश कटारिया नगरसेवक अतुल फंड बोरगावचे सरपंच विनय ननवरे ,श्रीकांत ढवळे ,अशपाक जमादार, महेश श्रीवास्तव आधी जण उपस्थित होते या दहीहंडी भव्य महोत्सवास करमाळा शहरातील राजेराव रंभा मित्र मंडळ देवीचा माळ, सावंत गल्ली ,मंगळवार पेठ, नागराज गल्ली ,राशिन पेठ ,फंड गल्ली, सिद्धार्थ नगर, युवा संघर्ष प्रतिष्ठान, स्वराज्य ग्रुप, रॉयल ग्रुप, धर्मवीर प्रतिष्ठान .इत्यादी गोविंद पथकांनी हजेरी लावली होती यावेळी करमाळा पोलीस स्टेशन सर्व बांधव व एम एस सी बी लाईट ऑफिस चे शिंदे साहेब व लष्कर साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले या भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजक संपूर्ण संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक रोहित चिवटे अध्यक्ष अनिकेत इंदुरे उपाध्यक्ष निरंजन कांबळे,कृष्णा येळवणे सचिव प्रज्वल पोळके कार्याध्यक्ष अमित कांबळे, व सर्व सदस्य झटून सहकार्य केले असल्याने सर्वाचे आभार मानले आहे.
