करमाळा शहर व तालुक्यात १७ सप्टेंबर रोजी ४३ कोरोना पाॅझिटिव्ह

करमाळा प्रतिनिधी . करमाळा शहर व तालुक्यात १७ सप्टेंबर रोजी एकूण २७९ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या आहेत. यामध्ये ४३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात २२ पुरुष तर २१ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात १५० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २६ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये कृष्णाजीनगर २ पुरुष, १ महिला किल्ला ३ पुरुष, ३ महिला खडकपुरा २ पुरुष कानाडगल्ली १ पुरुष, ६ महिला, कुंकूगल्ली २ पुरुष, १ महिला , वेताळ पेठ १ पुरुष जुनी कन्या शाळा १ महिला, शिवाजीनगर २ तर ग्रामीण भागात १२९ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये १७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जेऊर ३ पुरुष, १ महिला, आळजापूर १महिला, वंजारवाडी १ महिला,कुंभेज १ पुरुष ,शेलगाव १ पुरुष, १ महिला ,कोळगाव १ पुरुष करंजे १ पुरुष ,जिंती १ पुरुष, १ महिला, केतूर २ महिला, केम १ पुरुष, १ महिला यांचा समावेश आहे.
