घारगावचे सामाजिक कार्यकर्त संजय सरवदे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
करमाळा तालुक्यातील घारगावचे संजय सरवदे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात आज ऑफिसला जात असताना रोडच्या कडेला आपले काही समाज बांधव मेंढपाळ वाड्यावर बसले होते त्यांना भेटण्याची माझी इच्छा झाली व मी त्यांच्या वाड्यावर जाऊन त्यांची मी विचारपूस चौकशी केली व त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या त्यांच्याबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या त्यांना गावोगावी फिरत असताना काही अडचणी आल्या त्यांनी त्या सांगितल्या व लगेच त्यांनी सांगितले मामा आमचा मोबाईल चार्जिंग करायचा आहे ना लाईट ना पाणी अशी अडचण त्यांनी मला सांगितली कारण त्यांचा मोबाईल चार्ज करायचा होता लाईटची व्यवस्था नसल्यामुळे त्यांचे मोबाईल बंद होते मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे कोणाचा संपर्क होत नव्हता ही गोष्ट माझ्या लक्षात येताच तेथून माझे घर जवळच होते मी त्यांना लगेच घरी घेऊन आलो मोबाईल चार्जिंगला लावला आणि त्यांचा पाहुणचार चहा व नाश्ता जेवणाची व्यवस्था केली परंतु त्यांनी चहा व नाश्ता घेतला त्यांचे मन तृप्त झाले व त्यांनी माझे आभार मानले मला मोठ्या मनाने त्यांनी चहापान करण्यासाठी आमच्या वाड्यावर या असे आमंत्रण दिले हा आहे त्यांच्या मनाचा मोठेपणा मी परत वाड्यावर गेलो व त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून चहा पाणी घेऊन आलो मनाला खूप बरे वाटले प्रत्येकाने आपापली सामाजिक बांधिलकी समजून सहकार्य करावे धन्यवाद
