Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

करमाळा येथे मंगळवारी १३ ॲागस्ट रोजी शिवस्वराज्य यात्रेचे आगमन होतं असुन कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-माजी आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी मंगळवार दि.13 ऑगस्ट रोजी करमाळा येथे शिवस्वराज्य यात्रेचे आगमन होतं असुन कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे अहवान माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील यांनी सांगितले की,माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवनेरी किल्यावरून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली आहे.ही यात्रा आपल्या करमाळा तालुक्यामध्ये मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी आगमन करीत असुन करमाळा येथील अथर्व मंगल कार्यालयात राष्ट्रवादीचे प्रदेश आध्यक्ष जयंत पाटील,माननीय खासदार संसदरत्न सौ.सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादीचे प्रख्यात वक्ते खासदार डॉ.अमोलजी कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा होणार आहे.
या यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळातील करणाम्यांचा तसेच शेतकरी,महिला,युवाक यांच्या विरोधातील असलेल्या धोरणाबाबत परदा फाश करण्यात येत आहे. यामुळे शिवस्वाराज्य यात्रेच्या निमित्ताने करमाळा मतदार संघातील प्रलंबीत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि शिवस्वराज्य यात्रेला पाठींबा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी तसेच सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे गरजेचे आहे.यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे व खासदार अमोल कोल्हे यांची भाषणे होणार आहेत.शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा ही बरोबर 2 वा.होणार असुन कार्यकर्त्यांनी करमाळा येथील अथर्व मंगल कार्यालयात एकत्रित जमा व्हावे.
असे आव्हान माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष वारे,हनुमंत मांडरे-पाटील,बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल तसेच राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group