आचार्य बाळकृष्ण महाराज यांच्या वाढदिवसानिम्मित पंतजली योग समिती करमाळा यांच्यावतीने जडीबुटी दिन साजरा
करमाळा प्रतिनिधी पंतजली योग समितु करमाळा यांच्या वतीने जडीबुटी दिवस साजरा करण्यात आला आहे. यावेळी रामचंद्र कदम , राजू काका वाशिंबेकर, सुधिर पंडित , हनुमान सिंग परदेशी, बाळासाहेब नरारे ,प्रवीण देवी, वर्धमान खाटेर, पत्रकार नरेंद्र ठाकूर, डॉक्टर अमित कापले, डॉक्टर श्रीराम परदेशी, मनोज कुलकर्णी, सुरेश वायकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते घरोघरी जाऊन तुळशीचे रोप वाटप, तसेच कोरफड, तुळस, गुळवेल या वनस्पती विषयी महत्व सांगण्यात आले., तसेच या वनस्पती च्या सेवनामुळे आरोग्य निरोगी बनून वात, पित्त, कफ, कोरोना, डेंगू, मलेरिया यासारख्या आजारापासून मुक्तता मिळते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दारात अंगणात तुळस कोरफड आणि गुळवेल लावावीत असे आव्हान पतंजली योग समितीचे भारत स्वाभिमान प्रभारी श्री हनुमान सिंग परदेशी यांनी आवाहन केले आले आहे.
