Monday, April 21, 2025
Latest:
करमाळाकृषीजलविषयक

उजनी धरण ८० टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण

करमाळा प्रतिनिधी उजनी धरण आता ८० टक्के भरले असून , एकूण जलसाठा १०७ टीएमसी झाला असून , धरण १०० % भरण्यासाठी आता केवळ १० टीएमसी पाण्याची गरज आहे.धरणातील उपयुक्त जलसाठा ही ४३ टीएमसी झाला आहे.
दौंड येथून उजनी धरणात येणारा विसर्ग आता पूर्णपणे मंदावला असून, तो २७१७ क्युसेकपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे आता धरणाच्या पाणी पातळीत होणारी वाढही थांबली आहे.
असे असले तरी मागील पाच – सहा वर्षांच्या तुलनेत चालू पावसाळ्यात धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.यंदाच्या वर्षी अपेक्षेपेक्षा लवकर उजनी धरण १०० टक्के भरणार असल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group