करमाळा मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा … आ. संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते व मा. आ. जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली
करमाळा प्रतिनिधी
करमाळा माढा मतदारसंघातील आवाटी, निमगाव ह, व शेलगाव क या गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उद्या दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी संपन्न होत आहे.उद्या सकाळी 10 वाजता आवाटी येथील सीना नदीवरती मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन होणार आहे. 1 कोटी 78 लाख निधी या कामासाठी मंजूर आहे.निमगाव ह येथे सकाळी 11 वाजता महादेव मंदिर सभामंडप , दलित वस्ती रस्ता सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे, जनसुविधा मधून गावांतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीट करने, कोळगाव निमगाव गौंडरे रस्ता डांबरीकरण करणे या कामांचे भूमिपूजन तर जानपीर दर्गा सभामंडप लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. निमगाव येथील या सर्व कामांसाठी 1 कोटी 85 लाख निधी मंजूर आहे.शेलगाव येथे सकाळी 11:30 वाजता पांडे- शेलगाव – घोटी- केम रस्ता प्रजिमा १० सुधारणा करणे ,नाना दुकानदार ते काटूळे आबा वाडा रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करने,उद्धव शिंदे वस्ती ते विकास वीर वस्ती रस्ता मुरमीकरण करणे ,खरपा वस्ती, माळी वस्ती नं १ व मारुती मंदिर येथे हायमास दिवे बसविणे इत्यादी कामांचे भूमिपूजन होणार आहे शेलगाव येथील या कामांसाठी 2 कोटी 12 लाख निधी मंजूर आहे.या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ. संजयमामा शिंदे यांच्या कार्यालयातून करण्यात आले आहे.
