समाजसेवेचा अखंड झरा सावंत कुटुंब
समाजसेवेचा अखंड झरा म्हणजे सावंत कुटुंब करमाळा शहर तालुक्यामध्ये सावंत कुटुंब म्हणजे लोकांना न्याय देणारे लोकन्यायालय असुन गेल्या तीन पिढ्यांपासून लोकांना न्याय देण्याचे काम सावंत कुटुंब करीत आहे.कै.अनंता कोडींबा सावंत यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपला शेतीचा बैलाचा व्यापार सांभाळुन समाजसेवेचे कार्य केले.गल्लीत असो करमाळा शहरातील कुणाचा कुठलाही तंटा असो कुठलाही प्रश्न असो आबाकडे गेल्यावर तो प्रश्न मिटला असे समीकरण होते. कोर्टकचेरीत गेल्यावर जे प्रश्न मिटले नाही ते प्रश्न मात्र आबा चुटकीसरशी सोडवले. सोयरीक करण्यासाठी आबा सांगेल ती पुर्वदिशा म्हणुन सोयरिक जमवुन अनेकांचे संसार फुलवण्याचे काम त्यांनी केले आहे. सर्व जातीधर्माचे लोक सावंत कुटुंबाला आपले आधार मानुन सुखी संप्पन आयुष्य जगत आहेत.आबांनी अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्याचे काम केले असून घटस्फोटापर्यंत झालेला वाद एका शब्दात मिटवुन अनेकांचे संसार वाचवण्याचे काम केले आहे. गोरगरिबांना सदैव मदत करून आबांनी समाजसेवेचा वसा अखंड जपला असून कै.सुभाष आण्णा सावंत यांनी आपल्या वडिलांचा व चुलते माजी नगराध्यक्ष डी.के . सावंत यांचा वारसा जपत त्यांच्याबरोबरीने समाजसेवेचे कार्य चालू ठेवले हे कार्य करीत असताना बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली हमाल पंचायत संघटना स्थापना करून या संघटनेच्या माध्यमातून हमाल लोकांचे संघटन करीत हमाल लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले.कष्टकरी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने त्यांनी प्रस्थास्पित मंडळींविरुद्ध लढा उभारुन या लोकांना न्याय मिळवून दिला.समाजकार्याबरोबर राजकारणात भाग घेऊन आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणुन काम करून सर्वसामान्य शेतकरी कामगार लोकांसाठी काम करुन प्रस्थास्पित लोकांना धडा शिकवला.कामगाराचे कष्टकरी लोकांचे नेते म्हणुन त्यांची ओळख होती.सुभाष आण्णा सावंत यांचे निधन झाल्यानंतर समाजसेवेचा वारसा त्यांचे बंधु विठ्ठल आप्पा सावंत यांनी चालवला असून कुठल्याही प्रकारचे वाद भावकीचे जागेवरून पैशावरून भांडण असो,नवरा बायकोचे घटस्फोटापर्यंत गेलेला वाद असो कुठलाही प्रश्न असो पोलिस स्टेशन कोर्टकचेरीत न सुटलेले प्रश्न विठ्ठल आप्पा सावंत कुणाचीही बाजु न घेता सत्याच्या कसोटीवर तपासून योग्य निर्णय घेऊन न्यायदानाचे काम अचूकपणे करून सहज प्रश्न सोडवतात.त्यांच्या या कार्यात त्यांचे बंधु गोपाळराव सावंत, भगवानराव सावंत दादासाहेब सावंत यांचे सहकार्य लाभत असुन युवा पिढीही हा वारसा पुढे नेत असुन समाजकार्याबरोबर राजकारणात भाग घेऊन जनतेची सेवा करण्याचे काम पंचायत समिती सदस्य अँड राहुल सावंत नगरसेवक संजय पप्पु सावंत, युवा नेते सुनील बापु सावंत करीत आहेत.गोरगरीब लोकांचे संघटन करीत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करीत आहेत.जात,धर्म,पंथ रक्ताच्या नात्यापेक्षा सुखा दुःखात सहभागी होऊन माणुसकीचे श्रेष्ठ नाते जपण्याचे काम करत आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी समाजकार्य समाजकार्याच्या ठिकाणी असे सावंत कुटुंब सर्वांना आपलेसे वाटणारे आहे.सर्व राजकीय पक्षांबरोबर नेत्यांबरोबर सावंत गटाचे जिव्हाळ्याचे नाते संबंध आहेत.राजकारणात सावंत कुटुंबाचे अढळ स्थान असून करमाळा शहर व तालुक्यातील राजकारणात सावंत गट निर्णायक असून सावंत गट जेथे तिकडे सत्ता निश्र्चित असे समीकरण आहे.तालूक्याच्या राजकारणात विधानसभेला संजय मामा शिंदे यांचे समर्थन करीत विजयी पताका लावून सावंत गटाची यशदायी वाटचाल चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये सुध्दा सावंत गट निर्णायक भूमिका बजावणार असुन
नगरपालिका निवडणुकीत सत्तेची चावी सावंत गटाच्या ताब्यात आहे.सध्या सावंत गट शांत आहे कुणाची युती कुणाबरोबर झाली तरी विजय मिळवण्यासाठी व सत्ता हस्तगत करण्यासाठी सावंतगटाला बरोबर घेऊन सत्तेत वाटा मिळवावा लागणार आहे.सावंत कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपुन समाजकार्याचे हे कार्य चालू ठेवले असुन अखंडपणे समाजाची सेवा संकटात प्रत्येकांच्या मदतीला धावुन जाणारे प्रसिध्दीपासुन अलिप्त राहुन काम करणारे गोरगरिबांचे आधारवड, दातृत्व, कर्तृत्व, सामर्थ्य, गोरगरिबांना आधार देणारे, गोरगरिबांच्या मुलांचे लग्न करून देऊन गरीब मुलींचे कन्यादान करून सुद्धा केलेल्या कामाची कुठेही वाच्यता न करणारे, सावंत कुटुंब म्हणजे करमाळा तालुक्याचे वैभव आहे. युवा पिढींनी राजकारणामध्ये निर्णायक भूमिका घेऊन मोठ्या राजकीय पदावर विराजमान व्हावे ही जनतेची इच्छा आहे.
