करमाळयाचे सुपुत्र मंगेश चिवटे यांची मुख्यमंत्री विशेष अधिकारी तथा वैद्यकिय मदत कक्षप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल करमाळावासियाकडुन ६ संप्टेबंरला नागरी सत्कार
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे सुपुत्र पत्रकारितेच्या माध्यमातून सुरुवात करून आरोग्य सेवेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात करमाळ्याचे नाव उज्वल करणारे श्री मंगेश नरसिंह चिवटे यांची माननीय श्री नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विशेष कार्य अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या कक्ष प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल करमाळा तालुक्यातील जनतेच्या वतीने श्री मंगेश चिवटे यांचा जाहीर नागरी सत्काराचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी विकी मंगल कार्यालय येथे सायंकाळी चार वाजता होणार आहे तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करमाळा तालुका पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार सचिव नासिर शमशुद्दीन कबीर ,नागेश चेंडगे पत्रकार करमाळा श्री मंगेश चिवटे नागरी सत्कार समिती करमाळा तालुका पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे.
