संस्कृतीचा वारसा जपुन गणेशोत्सवात पंचवीस वर्ष प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले फंडगल्ली येथील लोकमान्य टिळक तरुण मंडळ लय भारी
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील लोकमान्य टिळक तरुण मंडळ फंड गल्ली येथील एक आदर्श मंडळ असुन यंदा या गणेश तरूण मंडळाला 74 वर्ष पुर्ण झाले आहे .गणेशोत्सवाबरोबर सामाजिक बांधिलकी जपुन समाजसेवेचे व्रत जपण्याचे काम केले असुन लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणारा समाजसुधारणेचा वारसा गणेशोत्सवाच्या माध्यमातुन जपला आहे. गणेशोत्सव साजरा करीत असताना राष्ट्रीय एकात्मता,हिंदु मुस्लिम एकता, व्यसनमुक्ती, साक्षरता,शेतकरी आत्महत्या निर्मुलन, अंधश्रध्दा निर्मुलन,मुलगा मुलगी समान या सामाजिक विषयावरील प्रबोधन देखावे साजरे करत पंचवीस वर्ष प्रथम क्रमांक मिळवला आहे. या मंडळाची मिरवणुक म्हणजे शहरवासीयासाठी सांस्कृतिक ठेवा जपणारी ठरली असुन याची सुरूवात श्री गणेशाची आरती मार्गदर्शक विलासराव घुमरे सर कन्हैय्यालाल देवी यांच्या हस्ते करून झाली पांरपारिक वाद्य वाजवत गणपतीची मिरवणुक मोठया उत्साहात आनंदामध्यै गणेशाचे गुणगान गात लेझीम नृत्य करत काढण्यात आली.ना डाॅल्बी ना गुलालाची उधळण ना धांगधिगा शिस्तबध्द पध्दतीने सांस्कृतीक वारसा जपत संस्कृतीचे दर्शन घडवत गणेशाची वंदना करत ही मिरवणुकीत संप्पन झाली या मंडळाचे वैशिष्ठ म्हणजे या मंडळात लहान थोरापासुन सर्व जाती धर्माचे गुण्यागोविंदाने या उत्साहात सहभागी होतात. इतर गणेशमंडळाचा विचार करता नुसता धांगडधिंगा पिक्चर गाण्यावर नृत्य गुलालाची बेसुमार उधळण करत मद्यंधुंद अवस्थेत मिरवणुक न काढता आदर्श नियमांचे पालन करून करमाळा शहरात आपल्या हिंदु संस्कृतीचे जतन करत गणेशोत्सव साजरा करण्याची पंरपंरा जपल्याने लोकमान्य टिळक तरूण मंडळाचे शहरवासियाकडुन सर्वत्र कौतूक होत आहे.
