करमाळा

सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या शेतकरी कामगाराचा आधार बनलेला गफुर शेख यांचे कार्य कौतुकास्पद – दशरथ अण्णा कांबळे*

करमाळा प्रतिनिधी: सर्वसामान्य कुटुंबातून जन्म घेतल्यावरही जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर ऊसतोड कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणारे आणि शेतकऱ्यांसाठी आधार बनणारे गफुर शेख यांचे कार्य समाजासाठी कौतुकास्पद आहे. असे मत शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे यांनी व्यक्त केले. गफुर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. त्यांनी आपल्या अनुभवातून कामगार आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे महत्त्व सांगितले आणि समाजाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे अधोरेखित केले. कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते. यामध्ये दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे, वाशिंबेचे सरपंच तानाजी बापू झोळ, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ रुपनवर पाटील, ओबीसी विभाग करमाळा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रताप जगताप, करमाळा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष साहेबराव वाघमारे, करमाळा शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप, सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष अशोक वाघमोडे, वाशिंबेचे माजी सरपंच भगवान अण्णा डोंबाळे, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष आनंद भैय्या झोळ, पोपळजचे संभाजी शिंदे पैलवान आणि हनुमंत पवार उपस्थित होते. सदर कार्यक्रमात गफुर शेख यांचा सत्कार करताना त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कामगिरीची दखल घेतली आणि समाजातील इतरांना प्रेरणा देण्यासाठी त्यांचे कार्य आदर्श असल्याचे सांगितले. सत्कार समारंभानंतर उपस्थितांनी गफुर शेख यांचे वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!