Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची परिक्षेची गैरसोय टाळण्यासाठी व्यवस्था करणार- दिपक चव्हाण                     

करमाळा प्रतिनिधी   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने शनिवारी २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक चव्हाण यांच्यावतीने व्यवस्था केली जाणार आहे.  करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यासाठी  संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी  केले आहे.
भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक चव्हाण म्हणाले, सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. हा संप कधी मिटेल हे सांगता येत नाही.  यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. खासगी वाहनचालकांकडूनही जादा पैसे घेतले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी करमाळा तालुक्यातून प्रवासाची व्यवस्था केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जायचे आहे, त्यांनी ७७६८०८६३०७ या क्रमांकावर संपर्क साधावा.वाहतूक व इतर कारणामुळे उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून शनिवारी होणाऱ्या या परीक्षेला उमेदवारीनी दीड तास अगोदर उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटले आहे की, उमेदवारांना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेसाठी परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रवेशप्रमाण पत्र उपलब्ध करण्यात आले आहे. संकेतस्थळावरून हे प्रवेशप्रमाणपत्र ऊन डाऊनलोड करून प्रिंट केलेले प्रमाणपत्र सोबत आणल्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी होऊ शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी याबाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधीत परीक्षेत उपकेंद्रावर उमेदवाराने उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उमेदवाराने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाचे कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही, असेही आयोगाने म्हटले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे व स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची पालन करणे आवश्यक राहणार आहे. आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक परस्पर अंतराच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही, या उपायोजना संदर्भात दिलेल्या सूचना याचे पालन करणे आवश्यक आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील उमेदवारांना परीक्षेच्या दिवशी उपकेंद्रावर पोहोचण्यासाठी लोकल प्रवासात अनुमती देण्यात आली आहे. प्रस्तुत परीक्षेच्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारांना परीक्षेचे ठिकाणच्या नजीकच्या रेल्वेस्थानकापर्यंतचे तिकीट प्राप्त करून घेता येईल, प्रवेश पत्र मिळविण्याबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवाराने संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group