भारत देशाच्या 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र दिनानिमित्त घारगाव ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ध्वजारोहण संपन्न
घारगाव प्रतिनिधी भारत देशाच्या 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र दिनानिमित्त घारगाव ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण समारंभ मोठ्या थाटामाटात मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता संपन्न झाला.आज संपूर्ण देशभरात घरोघरी राष्ट्रीय ध्वज फडकावून आनंद व्यक्त होतोय ध्वजारोहण नंतर पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.अमृत महोत्सवी दिनानिमित्त निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याची बक्षीस मान्यवरांचे असते देण्यात आली याप्रसंगी गावातील अनेक मान्यवर महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक आधी जण उपस्थित होते.
