मराठा क्रांती मोर्चा करमाळा यांच्यावतीने आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या दत्ता पाटील यांना पाठींबा देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी
मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे तो मराठा आरक्षणाचा आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव *दत्ता पाटील* गाव .हडसणी ता.हदगांव जि.नांदेड हे मुंबई आझाद मैदान येथे मराठा आरक्षण हे ओबीसी मधून 50% च्या आतूनच मिळावे .या प्रमुख मागणीसाठी उपोषणास बसले आहेत त्या उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्या वतीने दि.१७/०८/२०२२* वार : बुधवार वेळ १२ वाजता तहसील कार्यालय करमाळा येथे* *निवेदन देण्याचे ठरले आहे तरी सर्व मराठा बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


