आदिनाथ साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष गोविंदबापु पाटील यांचे दुःखद निधन साप्ताहिक पवनपुत्र परिवाराच्यावतीने भावपूर्ण श्रध्दांजली

करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ कारखान्याचे संस्थापक मा.अध्यक्ष करमाळा तालुक्याचे त्यागी व्यक्तिमत्त्व,आदर्श समाजकारणी,गोरगरिबांच्या हाकेला उभे राहणारे आणि करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या ऊसाचा चांगला भाव मिळावा म्हणुन तालुक्यात श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीसाठी पुढाकार घेऊन कारखाना उभारणीसाठी प्रयत्न केले .कारखाना उभा राहिल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ घेऊन 23 कारखान्याच्या उभारणीसाठी अनवाणी फिरणारे शिवसेनेचे माजी आमदार नारायण(आबा)पाटील यांचे वडील कर्मयोगी गोविंदबापू पाटील (वय 90) यांचे दि.20 जुलै रोजी अल्पशा आजाराने अकलुज येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच साप्ताहिक पवनपुत्र परिवाराकडून ईश्वर चरणी प्रार्थना
