करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा जिद्द चिकाटी परिश्रमाच्या जोरावर श्रीकांत गोडगे झाला पोलीस अधिकारी
*करमाळा प्रतिनिधी जिद्द चिकाटी परिश्रम करण्याची तयारी व संयम असेल तर माणूस नक्कीच आपले ध्येय प्राप्ती करू शकतो त्यासाठी श्रीकांत गोडगे याचे यश उत्तम उदाहरण आहे. श्रीकांत लक्ष्मण गोडगे यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला वडील लक्ष्मण गोडगे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक होते आई मंदा गोडगे या आदिनाथ सह साखर कारखान्याचे संचालक आहेत तर भाऊ पै.अतुल गोडगे हे शेती करतात भावाने सांगितले होते जोपर्यंत तू फौजदार होत नाहीस घरी यायचे नाही एमपीएससी करून अधिकारी होण्याचे ध्येय श्रीकांतने ठेवले होते त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पूर्व सोगाव येथे झाले यानंतर पाचवी ते बारावी चे शिक्षण त्यांनी महात्मा गांधी विद्यालय कर्जत येथे झाले यानंतर लोकमंगल कृषी महाविद्यालय सोलापूर येथे त्यांनी कृषी ही पदवी घेतली. शिक्षण पूर्ण करून अधिकारी होण्याची तयारी 2015 पासून सुरू केली 2016 व 2017 या वर्षी त्यांना पूर्व परीक्षा परीक्षेत यश आले परंतु मुख्य परीक्षेत अपयश आले 2018 साली पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा यामधे यश संपादन करून ते शारीरिक चाचणी साठी पात्र झाले परंतु शारीरिक चाचणीमध्ये लांब उडी मध्ये गरबडले व पंधरा मार्क कमी झाले व 100 पैकी 85 मार्क मिळाले होते त्यामुळे अवघ्या एक मार्कांनी पीएसआय होण्याचा प्रयत्न असफल झाला होता अशा परिस्थितीतही अपयशाने निराश न होता व कोरोना मध्ये परीक्षा पुढे जात असताना व न्यायालयीन प्रकरणाने देखील खूप अडथळा आला आई वडील भाऊ अतुल गोडगे यांच्या पाठबळामुळे व प्रोत्साहनामुळे पी एस आय चा नियमित अभ्यास केला. आणि अखेर त्यांनी 2020 आली आपल्या कष्टाच्या जीवावर महाराष्ट्रातून 91 व्या रॅंकने पास होण्याचा मान पटकावला असल्याचे त्यांनी सांगितले.करमाळा तालुक्यासारख्या ग्रामीण भागातून पूर्व सोगाव मधील शेतकरी कुटुंबातील युवकाने एमपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवुन पोलीस उपनिरीक्षक झाल्याबद्दल निश्चितच गावाचा तालुक्याचा बहुमान वाढवल्याने सोगाव ग्रामस्थांच्यावतीने श्रीकांत लक्ष्मण गोडगे यांचा ढोल ताशाच्या गजरामध्ये घोड्यावर मिरवणूक काढून ग्रामस्थांच्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित बागल गटाचे युवा नेते मकाईचे मा. चेअरमन दिग्वीजय बागल आदिनाथ कारखान्याचे सर्व संचालक मकाई कारखान्याचे संचालक व मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या सत्कार समारंभ कार्यक्रमास मा.चेअरमन धनंजय डोंगरे माकाई सह. साखर कारखाना चेरमन दिनेश भांवलकर ,नानासाहेब लोकरे, किरण कवडे, गणेश झोळ,बापू चोरमले,रेवन्नाथ निकत,युवराज रोकडे केरू गव्हाणे, अविनाश वाळेकर, दिलीप केकान, दत्ता सरडे, लक्ष्मण महाडिक, संदीपान चौधरी, प्रमोद बदे,दिनकर सरडे,सचिन पिसाळ,विजय गोडगे,प्रवीन सरडे,कल्यान सरडे,महादेव सरडे,,सुयोग झोळ, डॉ.विजय रोकडे,गणेश तळेकर,अक्षय कुलकर्णी,अर्जून तकीक,चंद्रशेखर जोगळेकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले तर आभार महेश निकत यांनी मानले.
