मकाई सहकारी साखर कारखान्याच्या नूतन चेअरमनपदी दिनेश भांडवलकर यांची एकमतांनी निवड
करमाळा प्रतिनिधी
श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या नूतन चेअरमन पदी दिनेश भांडवलकर यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे.
बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल युवा नेते दिग्विजय बागल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे.यावेळी अनुमोदक व सूचक म्हणून ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पांढरे व संचालक सतीश निळ यांनी स्वाक्षरी केली आहे. याप्रसंगी संचालक अजित झांजुर्णे, रेवननाथ निकत, बाळासाहेब पांढरे, आशिष गायकवाड, आश्विनी झोळ, रामचंद्र हाके, अमोल यादव, संतोष पाटील,नवनाथ बागल,उत्तम पांढरे, दिनकर सरडे, सतिश नीळ, युवराज रोकडे, सचिन पिसाळ, कोमल करगळ, अनिल अनारसे, बापू चोरमले हे उपस्थित होते.
