सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडविणारा दहीहांडी उत्सव उपक्रम प्रेरणादायी- पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे
कोर्टी प्रतिनिधी आजच्या धकाधकीच्या जीवनात सण उत्सवाने मनुष्याला एक प्रकारची उर्जा मिळत असुन जीवनाला एक नवी दृष्ठी प्राप्त होते दहीहांडी उत्सव सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडविणारा आशिष गायकवाड युवा मंचचा उपक्रम प्रेरणादायी असे मत पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणेसाहेब यांनी व्यक्त केले. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिम्मित दरवर्षी सालाबादप्रमाणे आशिष भैय्या गायकवाड युवा मंचच्यावतीने दहीहांडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या उत्सवात तीन गोविंदा मंडळानी भाग घेतला होता यामध्ये संगम तरुण मंडळ घातक ग्रुप राजधानी फिटनेस क्लब यांनी या स्पर्धत सहभाग घेतला असुन यामध्ये संगम तरुण मंडळानी प्रथम क्रमांकाचे २१०००बक्षिस मिळवले असुन इतर मंडळाना उत्तेजनार्थ बक्षिसे सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे,युवा नेते मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल,आशिष गायकवाड, कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती शिवाजी बंडगर सर राष्ट्रवादी काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे,यशकल्याणी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील,मकाई साखर कारखान्याचे संचालक रामभाऊ हाके,नंदकुमार भोसले, दत्ता गायकवाड कृषी उत्पन बाजार समिती संचालक अमोल झाकणे,देवा ढेरे,शशिकांत केकान व सर्व संचालक व ग्रामस्थ गोविंदाप्रेमी उपस्थित होते.
