डायल 112 ला फोन करून खुनाची खोटी माहिती देणाऱ्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील करमाळा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे धायखिंडी तालुका करमाळा येथे खून झाले बाबत इसम नाव रोहन दिलीप सोरटे राहणार देवीचा माळ तालुका करमाळा यांनी त्यांच्या मोबाईलवरून डायल क्रमांक 112 या नंबर वर फोन करून खुन झाले असल्याची माहिती दिली 112 ही पोलीस खात्याकडून तात्काळ सुविधा पुरवणारी यंत्रणा असल्याने करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ सरकारी वाहनाने मोजे धायखिंडी तालुका करमाळा गावी जाऊन गावात सर्व चौकशी केली असता गावातील लोकांनी खुणाचा प्रकार घडले नसल्याबाबत सांगितले यावरून पोलीस करमाळा पोलिसांकडून सदर फोन नंबरची माहिती घेतली असता खोटी माहिती देणाऱ्या इसम रोहन दिलीप चोरटे राहणार देवीचा माळ करमाळा अशी असल्याचे निष्पन्न झाले नंतर त्याच्यावर पोलिसांनी खोटी माहिती देऊन पोलिसांना दिलेल्या सुविधाचा गैरवापर केले बाबत त्याचे विरुद्ध पो.ना. प्रदीप रामेश्वर जगताप यांनी फिर्यादी दिल्याने गुन्हा दाखल करून यातील खोटी माहिती देणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे यावेळी माननीय सूर्यकांत कोकणे पोलीस निरीक्षक यांनी कोणी चुकीची माहिती देऊन डायल 112 वर फोन केल्यास व पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्यास यापुढे देखील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच डायल 112 या सुविधेचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घेणे याबाबत नागरिकांना सूचना दिल्या आहेत डायल 112 ही सुविधा जनतेच्या अडीअडचणी करता तात्काळ सेवा पुरवणारी सुविधा आहे त्यामुळे सदर सुविधेचा गैरवापर करू नये असे आवाहन करमाळा पोलीस ठाणे तर्फे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी केले आहे.
