रामदास झोळ फाऊंडेशन च्या वतीने वाशिंबे चौक,सोगाव चौक, टापरे चौकातील अपघात टाळण्यासाठी बसवले काँर्नर मिरर(आरसे)
वाशिंबे प्रतिनिधी
कुंभेज फाटा ते करपडी फाटा रस्ता विकसित झाल्याने या मार्गावर वेगवान वाहतूक सुरू झाली आहे.त्यामुळे वाशिंबे चौफुला,सोगाव म्हसोबा मंदीर.टापरे चौक येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी प्रा. रामदास झोळ फाऊंडेशन यांच्या वतीने या तिन्ही चौकात काँर्नर मिरोर(आरसा) बसविण्यात आले.
यापुर्वी ही रामदास झोळ फाऊंडेशन यांच्या वतीने भैरवनाथ मंदीर परिसर,वाशिंबे स्मशानभुमि येथे वृक्षारोपण करुन संगोपन करण्यात आले आहे.गावातील ज्येष्ठ नागरीकांना बसण्यासाठी २५ बेंच देण्यात आल्या.ईश्रमकार्डचे २०० नागरीकांना मोफत वाटप करण्यात आले.वाशिंबे गावासाठी ग्रामपंचायत वाशिंबे आपले सहर्ष स्वागत करत आहे या नावाने भव्य प्रवेशद्वार बांधण्यात येणार आहे.यासह नवयुग तालीम येथे जिमचे साहित्य,वाशिंबे भजनी मंडळ साहीत्य,बौद्ध विहार साठी आँल कंपाऊंड,बापू बोबडे वस्ती ते प्रा.जाकीर शेख सर वस्ती संपूर्ण रस्ता मुरुमीकरण,दलित वस्ती रस्ता काँक्रीट, अशी कामे येत्या आठ दिवसात हाती घेण्यात येणार आहेत असे प्रा. झोळ यांनी सांगितले.
