कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयात संस्थेने केली सीसीटीव्ही सिस्टीम कार्यान्वित.

करमाळा प्रतिनिधी. समाज सेवा मित्र मंडळ संचलित कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा मध्ये संस्थेने सीसीटीव्ही सिस्टीम कार्यान्वित केल्याची माहिती संस्थेचे सचिव श्री.गुलाबराव बागल यांनी दिली आहे.
विद्यालयात श्री.वीर हे मुख्याध्यापक असताना संगणकांची चोरी झाली असता त्याचा तपास लागू शकला नाही श्री.सांगडे यांच्या मुख्याध्यापक पदाच्या कार्यकाळात विद्यालयाचे अनेक कार्यालयीन कागदपत्रे व फाईली गहाळ झालेले आहेत श्री.सारोळकर हे मुख्याध्यापकपदी कार्यरत होताच विद्यालयाचे हजेरी पत्रक चोरीस गेले त्याबाबत पोलिसात फिर्याद देऊनही काही निष्पन्न होऊ शकले नाही.
गेले अनेक दिवसांपासून विद्यालयात अनेक अनधिकृत व्यक्तींचा वावर व त्यांचा अनावश्यक वाद विवाद यांना प्रतिबंध करण्यासाठी पुरावा उपलब्ध नसल्याने मुख्याध्यापक श्री सारोळकर सर यांना त्यांचा बंदोबस्त करणे अवघड होत असे ही अडचण दूर करण्यासाठी संस्थेने विद्यालयात सीसीटीव्ही सिस्टीम आवाज रेकॉर्डिंग सह कार्यान्वित करण्याचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही केली आहे सहा सीसीटीव्हीच्या कॅमेरा मध्ये विद्यालयाची संपूर्ण इमारत क्रीडांगण व कार्यालय अंतर्भूत होत असल्याने संस्थेच्या कार्यालयातूनच विद्यालयाच्या कामकाजावर संस्थेला नजर ठेवता येईल.सीसीटीव्ही चित्रीकरण व साऊंड रेकॉर्डिंग सोयीमुळे मुख्याध्यापकांना शालेय कामकाज सुव्यवस्थितपणे पार पाडणे शक्य होईल व अनाधिकृत व्यक्तींचा त्यांना त्रास होणार नाही.
सदर शुभारंभ प्रसंगी संस्था सचिव श्री.गुलाबराव बागल मुख्याध्यापक श्री.सारोळकर उपमुख्याध्यापक श्री.राजकूमार जगताप पर्यवेक्षक श्री.भस्मे सर सहशिक्षक श्री.काझी सर,श्री.शरद शिंदे व लिपिक श्री.रवी शिंदे इत्यादी उपस्थित होते.
