युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल भैय्या चांदगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त ८ जुन रोजी महा रक्तदान शिबीर अभिष्टचिंतन सोहळा*
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील युवा उद्योजक सोलापूर जिल्हा युवा समन्वयक निखिल चांदगुडे यांच्या आठ जून रोजी असणारे वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास पाण्याचा जार प्रमाणपत्र सह सप्रेम भेट देण्यात येणार आहे. हे रक्तदान शिबिर सकाळी दहा ते सहा या वेळेमध्ये साई कमल लॉज बायपास रोड करमाळा येथे होणार आहे .रक्तदान हेच हेच खरे जीवनदान असून मानवी रक्त कृत्रिमरित्या कुठेही तयार करता येत नाही. त्यामुळे आपण केलेले रक्तदान आपले रक्त हे एखाद्याचा जीव वाचू शकते याच्यासारखे कोणतेही पुण्यकार्य कुठलेही नाही त्यामुळे या भव्य रक्तदान महाशिबिरामध्ये करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी सहभागी होऊन उस्फूर्तपणे रक्तदान करावे असे आवाहन निखिल भैया चांदगुडे मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरानंतर निखिल भैया चांदगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत मान्यवर नेते मंडळाच्या उपस्थितीत मित्रमंडळाचेवतीने भव्य अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे.तरी या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा तसेच अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
