नामदेव मारुती वायकुळे यांचे निधन

करमाळा प्रतिनिधी. मौजे खांबेवाडी ता.करमाळा येथील रहिवासी असलेले नामदेव मारुती वायकुळे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी नुकतेच दिनांक 8 ऑगस्ट 2020 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक श्री.अशोक मारुती वायकुळे यांचे ते जेष्ठ बंधू होते ते अतिशय मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचे होते.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलगा सून नातवंडे एक भाऊ आणि तीन बहिणी असा मोठा परिवार आहे त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे खांबेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
