करमाळाताज्या घडामोडी

उस्मानाबाद जिल्ह्याप्रमाणे बॅण्ड वाजविण्यास परवानगी द्या करमाळा बॅण्ड असोशिएशन ची मागणी

करमाळा प्रतिनिधी. लाॅकडाऊन दरम्यान बॅण्ड मालक व कलाकार यांची अतिशय हलाखीची परिस्थिती झालेली असून कलाकार अन्नाला मोहताज झालेले आहेत.एका बॅण्डपथकात किमान पंधरा कलाकार असून पंधरा कूटूंबांची रोजी रोटी एका पथकावर अवलंबून असते.
अशा परिस्थितीत शेजारील उस्मानाबाद जिल्ह्यात. मा. कलेक्टर साहेब यांच्या आदेशाने पाच कलाकार व वाहनांसह लग्नसमारंभात बॅण्ड वाजविण्याची परवानगी देण्यात आलेली आहे . त्याच धरतीवर सोलापूर जिल्ह्यात देखील नियमांत अधिन राहून सोशल डिस्टन्स पाळून लग्नसमारंभास बॅण्ड बॅन्जो वाजविण्यास परवानगी द्यावी अशा आशयाचे निवेदन येथील बॅण्ड संघटनेतर्फे करमाळा तहसीलदार कार्यालयाला देण्यात आले. या संदर्भात लवकरच एक शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा .शरद पवार यांची भेट घेणार असून त्यांच्याकडे देखील हिच विनंती करणार असल्याचे सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group