कामगार नेते स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या 6 व्या स्मृतीदिना निमित्त 14 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन :- ॲड.राहुल सावंत

करमाळा प्रतिनिधी कामगार नेते स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या 6 व्या स्मृती दिनानिमित्त करमाळा शहरातील हमाल भवन, मार्केट यार्ड , करमाळा येथे दि.14 ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व सध्या रक्ताचा तुटवडा विचारात घेता जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करुन देशाबद्दल व आपल्या देशातील माणसांबद्दल आपला सामाजिक कार्याचा खारीचा वाटा तरुणांनी उचलावा अशी विनंती करमाळा तालुका हमाल पंचायतीचे अध्यक्ष व पं.स.करमाळाचे सदस्य ॲड.राहुल सावंत यांनी विनंती केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ॲड.राहुल सावंत म्हणाले की, कामगार नेते स्व.सुभाषआण्णा सावंत यांच्या स्मृती दिनानिमित्त् दरवर्षी आम्हीं विविध सामाजिक उपक्रम राबवून आण्णांच्या स्मृतींना उजाळा देत असतो. त्यामध्ये करमाळा शहर व तालुक्यातील गुणवंत कामगारांचा सन्मान गुणवंत पाल्यांचा सन्मान, वृक्षारोपन, स्वच्छता अभियान, आरोग्यशिबिर, मुक्या प्राण्यांना चारा वाटप, मोफत पाणी पोयी यासह गोरगरीब कुटूंबातील सदस्यांना अन्नधान्याचे वाटप असे उपक्रम राबवित असतो. मात्र आपल्या देशामध्ये मार्च महिन्या पासून कोरोना सारख्या महाभयंकर महामारीमुळे देशासमोर संकट आलेले असल्यामुळे फक्त यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
या दिवशी रक्तदान शिबिरामध्ये विक्रमी रक्तदात्यांनी रक्तदान करुन देशाबद्दल खरे प्रेम व सेवाभाव दाखविण्यासाठी आम्हीं संधी उपलब्ध करुन देत आहोत या संधीचा उपयोग गरजू रुग्णांना व ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांना होण्यासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याची विनंती ॲड.राहुल सावंत यांनी केली आहे. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुका हमाल पंचायत सर्वजण, छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ सावंत गल्ली हे पूर्णपणे नियोजन करत असल्याचे पण यावेळी त्यांनी स्पष्ट केले. आता पर्यंत छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने 22 वेळा रक्तदान शिबिर यशस्वी करुन हजारो रुग्णांना रक्ताची गरज असताना ती गरज पूर्ण करण्याचे काम मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
