आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून वीट रावगाव झरे पोफळज केडगाव गावातील रस्त्याच्या विकासासाठी 1कोटी निधी मंजूर ग्रामस्थांकडुन अभिनंदनाचा वर्षाव -उदय ढेरे
करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघातील रस्त्याचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे काम विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांनी केला असुन वीट येथील रस्त्यासाठी एक कोटी रुपये निधी हिवाळी अधिवेशनात मंजूर केला आहे असे मत आमदार संजयमामा शिंदे समर्थक युवा नेते माजी सरपंच उदय ढेरे यांनी व्यक्त केले. करमाळा तालुक्याचे विकासरत्न आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात सर्वांगीण विकासाची कामे चालू असून रस्ते पाणी वीज यासंबंधीची कामे करून विकासाची गंगा आणण्याचे काम संजयमामा यांनी केल्यामुळे सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी आहे. वीटसह या गावातील रस्त्याच्या प्रश्नासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला असल्यामुळे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रावगाव वीट झरे पोफळज केडगाव येथील गावातील जनतेचा प्रश्न मार्गी लागला आहे.यामुळे येथील पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच वीट येथील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असून वीट गावातील ग्रामस्थांनी आमदार संजयमामा शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
