Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

E.V.M. हटाव.देश बचावअशा घोषणा देत काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन

करमाळा प्रतिनिधी – E.V.M. हटाव.. देश बचाव… अश्या घोषणा देत काँग्रेस पक्षाच्या वतीने मा. तहसीलदारसाहेब यांना पदाधिकारी यांच्या हस्ते निवेदन दिले. नुकत्याच झालेल्या चार राज्याच्या निवडणूक निकाला वरून बराच संशय व्यक्त होत आहे.सुरुवातीला पोस्टल मतदान मोजले जात असते त्यावेळी सर्वात ज्यास्त जागा या काँग्रेस पक्षाला होत्या. परंतु ज्यावेळी E.V.M. मशीन वरील मतदान मोजत असताना काँग्रेस पक्षाची पीछेहाट झाली. या गोष्टीमुळे संपूर्ण देशामध्ये सामान्य नागरिकांमध्ये संशया स्पद वातावरण आहे. जगातील अनेक विकसित देशामधेही E.V.M.मशीनवर मतदान होत नाही त्याठिकाणी मतपत्रिकावरच मतदान होते.सत्तेच्या जीवावर पैसा… पैशाच्या जीवावर सत्ता… हेच एकमेव सूत्र BJP चे असून सामान्य जनतेच्या मनात क्रोध निर्माण होत चालला आहे.जर मतपत्रिकेवर सर्व निवडणुका झाल्या तर सामान्य जनतेच्या मनातील संभ्रम दूर होऊन निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास
संपादन होईल. सदर निवेदनातून करमाळा तालुक्यातील सामान्य जनतेच्या भावना या निवडणूक आयोगा पर्यंत पोहचव्याव्यात अश्या प्रकारचे निवेदन मा. तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी किसान काँग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष दादासाहेब कुदळे,युवक तालुकाध्यक्ष संभाजी शिंदे,युवक शहराध्यक्ष सुजय जगताप, ओबीसी सेलचे जिल्हाउपाध्यक्ष दस्तगीर पठाण, सचिव जैनुदिन शेख,उपाध्यक्ष रमजानभाई मुलाणी, छगन मोहोळकर,बबलू चिंचकर,सुलतानभाई शेख,नितीन चोपडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.मागण्या मान्य नाही झाल्यातर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून दिला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group