Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

करमाळ्याची जागा शिवसेनाच लढवणार – राहुल कानगुडे मुख्यमंत्र्यांचे काम घराघरापर्यंत पोहोचवणार उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील

करमाळा (प्रतिनिधी )गेली पंचवीस वर्षापासून महायुतीमध्ये करमाळ्याची जागा शिवसेनेकडे असून या विधानसभेला सुद्धा संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे विधानसभा लढवणार असून इतर गटातटाच्या भूलथापांना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी बळी पडू नये असे आवाहन करमाळा शिवसेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे यांनी केले आहे.लवकर संपूर्ण तालुक्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून दोन महिन्यात या मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले काम पोहोचवणार असल्याचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील यांनी सांगितले.

सध्या तालुक्यात बागल गट स्वतंत्र लढवणार असे सांगत भाजपची उमेदवारी आम्हालाच मिळणार असा दावा करत आहे
दुसऱ्या बाजूला अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यावर्षीही अपक्ष निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे.या पार्श्वभूमीवर करमाळा शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.करमाळा विधानसभा मतदारसंघातून धनुष्यबाण चिन्हावर जयवंतराव जगताप व नारायण पाटील दोघेही आमदार झाले होते.1999 साली शिवसेना पुरस्कृत म्हणून स्वर्गीय दिगंबर बागल आमदार झाले होते.2019 च्या निवडणुकीत रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश करून धनुष्यबाण घेतला होता मात्र या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पुन्हा त्या राष्ट्रवादीत गेल्या होत्या.यामुळे सातत्याने स्वार्थासाठी गटतट बदलणारा उमेदवारी देऊ नये ही भावना शिवसेना-भाजप युती सह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याआर पी आय महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष रयत क्रांती संघटना या सर्व महायुतीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांची एकच भूमिका असून बाहेरचा उमेदवार लागू नका ही भूमिका आहे.याबाबत बोलताना कुरूडवाडी येथील शिवसेनेचे शहर प्रमुख समाधान दास म्हणाले कीकरमाळा विधानसभा मतदारसंघ धनुष्यबाणावर निवडून आणण्याची जबाबदारी शिवसेनेचे सचिव संजय मशील कर यांनी त्यांच्या खांद्यावर घेतले आहे.महेश चिवटे हे करमाळा विधानसभा साठी आमचे सक्षम उमेदवार असून त्यांना कुर्डूवाडी शहर व माढा तालुक्यातील छत्तीस गावातून लीड देण्याची जबाबदारी प्रत्येक शिवसैनिक पार पाडणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group