माढा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या वरील खोटा गुन्हा रद्द करा शिवसेनेची मागणी जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांना दिले निवेदन
करमाळा प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या विरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळी ते हजर नसताना त्यांचे नाव आरोपी म्हणून दाखल करण्यात आले आहे या प्रकरणाची पूर्ण तपासणी करून या गुन्ह्यातून महेश साठे यांचे नाव कमी करावे अशी मागणी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.जिल्हाप्रमुख महेश चिवटे
युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे,शेलगाव चे माजी सरपंच अंकुशराव जाधव,मोरवड विकास संस्थेचे चेअरमन माळी यांच्या उपस्थितीत ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस प्रमुख श्री अतुल कुलकर्णी यांची सोलापूर कार्यालयात करमाळा तालुक्यातील गुन्हेगारी अवैद्य धंदेयेणारे सण उत्सव व निवडणुका शांततेत होण्यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांच्याशी चर्चा झालीलवकरच करमाळा येथे सर्व पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक घेऊन करमाळातील समस्यावर चर्चा करू अशी आश्वासन दिलेतसेच जेऊर येथे नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यासंदर्भात प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी ठोस काम करू असे आश्वासन अतुल कुलकर्णी यांनी दिले आहे.
