करमाळाराजकीय

तळागाळापर्यंत पक्षाची बांधणी करा सत्तेचा फायदा सर्वसामान्यापर्यंत पोहोचवा नूतन जिल्हाप्रमुखांचा प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते सत्कार

 

करमाळा प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता खुश असून येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून त्यासाठी जबाबदारी दिलेल्या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांनी तन-मंनाने काम करून संघटना मजबूत करावी असे आव्हान शिवसेनेचे नेते तथा सोलापूर संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केले
सोलापूर जिल्ह्यातील नूतन जिल्हाप्रमुख अमोल शिंदे मनीष काळजी चरण पाटील महेश चिवटे यांचा सत्कार प्राध्यापक सावंत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सोलापूर शहर प्रमुख मनोज शेजवळ मोहोळ तालुकाप्रमुख प्रशांत बाप्पू भोसले माढा तालुका प्रमुख शंभूराजे साठे कुर्डवाडी शहर प्रमुख समाधान दास करमाळा शहर प्रमुख संजय शीलवंत उपशहर प्रमुख नागेश गुरव राजेंद्र काळे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले उपजिल्हाप्रमुख तुकाराम मस्के आधी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला

या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले की सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी संपूर्ण जिल्ह्यात गावोगावात पक्षाची बांधणी करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार पक्ष बांधणी सुरू आहे शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी या सर्व निवडी केल्या असून या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना फार मोठी संधी मिळाली असून या संधीचे सोने करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी काम करावे

यावेळी बोलताना अमोल बापू शिंदे म्हणाले की प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे गेली 25 ते 30 वर्षापासून शिवसेनेत सक्रिय असून तळागाळातील शिवसैनिकांच्या व पदाधिकाऱ्यांच्या अडचणी त्यांना माहित आहेत त्यामुळे एक प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्यासारखा सक्षम नेता आपल्या पाठीशी उभा असल्यामुळे येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्हा शिवसेना मय करण्यास वेळ लागणार नाही

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर प्राध्यापक नामदार तानाजीराव सावंत यांनी टाकलेली जबाबदारी मी सक्षमपणे पार पडणार असून येणाऱ्या काळात प्राध्यापक तानाजीराव सावंत सांगतील त्याच पद्धतीने जिल्ह्याचे राजकारण व समाजकारण होईल अशा पद्धतीचे संघटन आपण सर्वजण मिळून करू
यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा हार फेटा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

####
संपूर्ण जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारिणी लवकरच जाहीर होणार असून सोलापूर जिल्ह्यातील ज्यांना शिवसेनेत काम करायचे आहे अशांनी संबंधित जिल्हाप्रमुखांशी संपर्क साधावा असे आवाहन ही प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group