करमाळा तालुक्यातील विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करून प्रश्न मार्गी लावू -तानाजीराव सावंत
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करून तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लावू असा विश्वास मंत्री तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केला आहे.
आज विधान भवन मुंबई येथे करमाळ्यातील विविध प्रश्न संदर्भात नामदार तानाजी राव सावंत यांना खासदार रणजितसिंह निंबाळकर माजी आमदार नारायण आबा पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी निवेदन दिले
करमाळा तालुक्यातील सरफडोह येथील हजारो एकर जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वर्ग तीन नोंद प्रशासनाच्या चुकीमुळे लागली आहे यामुळे या भागातील जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार बंद असून वाटप प्रक्रिया तसेच कर्ज मिळणे ही शेतकऱ्यांना दुरापास्त झाले आहे गेली दहा ते पंधरा वर्षांपासून या भागातील हजारो शेतकरी आपल्या स्वतःच्या जमिनी वर स्वतःचे नाव लावण्यासाठी झगडत आहेत मात्र त्यांना न्याय मिळत नाही अशाच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील एका संपूर्ण गावावरून लावलेले वर्ग 3 ची नाव कमी करण्यात आले. मात्र करमाळा तालुक्यातील सरपडोह गावाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे या भागातील शेतकऱ्यांनी न्याय मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे याबाबतची सर्व पुराव्यांशी निवेदन देण्यात आले
कामोणे व देवळाली येथे जवळपास 200 घरकुल मंजूर झाले असून गावठाण व गायरानातील जमिनीवर वास्तव्यास असलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वन विभाग असा उल्लेख येत असल्यामुळे या भागातील गोरगरीब दलित मागासवर्गीय कुटुंबासाठी आलेली घरकुलाचा लाखो रुपयाचा निधी पडून आहे यामुळे अनेक जण घरापासून वंचित आहेत
मांगी तलावाचा कुकडी प्रकल्पात समावेश करून दरवर्षी पावसाळ्यात कुकडी प्रकल्पातून अतिरिक्त पाणी उजनी धरणात सोडले जाते हे पाणी पावसाळ्यातच मांगी तलावात सोडून पावसाळ्यातच तलाव भरून घ्यावा
कुकडी प्रकल्पात करमाळा तालुक्याचे तीन टीएमसी पाणी राखीव आहे मात्र हे पाणी 279 किलोमीटरचा प्रवास करत येत असल्यामुळे करमाळात पाणी पोहोचत नाही पाण्याचा प्रवासादरम्यान पाण्याची अनेक ठिकाणी तोडफोड व चोरी होते यामुळे हे तीन टीएमसी पाणी कुकडी प्रकल्पातून थेट उजनी धरणात सोडावे व तेथे रिटेवाडी उपसा सिंचन योजना निर्माण करून रिटेवाडी येथील येथून पंप हाऊस च्या माध्यमातून पाणी उपसा करून विहाळ टेकडीवरील कॅनल मध्ये सोडून करमाळा तालुक्यातील जवळपास वीस हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणावे. कुकडी प्रकल्पातील कॅनॉल साठी जवळपास 300 कोटी रुपये खर्च करून सर्व कॅनल तयार झालेले आहेत फक्त याच पाणी सोडण्याची गरज आहे यासाठी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेला मंजुरी द्यावी या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या साठी मंत्रालयात बैठक लावावी अशी मागणी निवेदनाद्वारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार नारायण आबा पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली
यावर तात्काळ मंत्री तानाजी सावंत यांनी या सर्व विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत बैठक लावण्या संदर्भात उचित कारवाई करण्याचे आदेश ओएसडी कृष्णा जाधव यांना दिले आहेत.
तालुक्यातील हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नामदार तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतल्यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
######
महेश चिवटे!
###
खासदार रणजितसिंह निंबाळकर व माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी या सर्व विषयात मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे आग्रह धरला असून या बैठकीत या सर्व विषयावर सविस्तर चर्चा झाली लवकरच याबाबतीत प्राध्यापक मंत्री तानाजीराव सावंत पुढाकार घेऊन करमाळा तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केला आहे.
