करमाळयासारख्या गावात गोपालन करून गोरक्षणाचे महान कार्य करणारे श्रेणिकशेठ खाटेर यांचे कार्य कौतुकास्पद- पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे
करमाळा प्रतिनिधी गुरुगणेश दिव्यरत्न गोशाळेच्या माध्यमातुन करमाळयासारख्या गावात गोपालन करुन गोरक्षणाचे महान कार्य करणारे श्रेणिकशेठ खाटेर त्यांच्या कुटुंबाचे कार्य कौतुकास्पद आहे असे मत करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी व्यक्त केले.
करमाळा येथील गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेमध्ये पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या हस्ते गाईंचे पूजन करून बैल पोळा साजरा करण्यात आला. बैलपोळयानिम्मित गाईंना विविध रंगानी रंगवण्यात आले होते. त्यानंतर पोलिस, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार महिलांच्या भगिनीच्या उपस्थितीत गाई पूजनाचा सोहळा पार पडला. श्रेणिकशेठ खाटेर यांच्यासह त्यांचे सहकारी व गाईंवर प्रेम करणाऱ्या कामगारांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी पिंटूशेठ गुगळे, रमेश कटारिया, अमृत कटारिया, कचरूलाल मंडलेचा,नगरसेविका सौ. संगिताताई खाटेर, काय सांगता’ न्यूज पोर्टलचे पत्रकार अशोक मुरूमकर, पत्रकार दिनेश मडके,सिध्दार्थ वाघमारे, विजय मंडलेचा, अनिल सोळंकी, जीवनभाई संचेती, शंकर रासकर, दिनेश मुथा, वैभव दोशी, केतन संचेती, गणेश बोरा, नीरज गुगळे, प्रकाश मुनोत,ॲड संकेत खाटेर,वर्धमान खाटेर, आदेश ललवाणी, चंद्रकांत काळदाते, विजय बरीदे, गिरीश शहा, प्रीतम राठोड व अभय शिंगवी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोपालन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रेणिक खाटेर यांनी गोपालन संस्थेविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की सध्या या गोशाळेमध्ये ८१ गायी असुन समाजाच्या सहकार्यातुन २००६ सालापासुन सुरु आहे.समाजाच्या पाठबळावर गुरुच्या आशिर्वादाने हे कार्य चालु आहे. यावेळी पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले सध्याच्या काळात गोहत्या मोठया प्रमाणात होत असताना त्या गाईच्या जीवाचे रक्षण करुन त्या गाईना गोशाळेच्या माध्यमातुन पालन पोषण करून गोरक्षणाचे करत असलेल्या संस्थेच्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर सयोजकांच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितानी गाईची पूजा करून पुरण पोळीचा घास भरवण्यात आला. तेथेच उपस्थितांसाठी भोजनाची सोय करण्यात आली होती सर्वानी सहभोजनाचा भोजनाचा आस्वाद घेतला.
