Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

कोणतेही विकास काम कागदावरच सुरू होते -आमदार संजयमामा शिंदे.


करमाळा प्रतिनिधी
अनेक अडचणी वरती मात करून करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी आपण 3490 कोटी निधी खेचून आणला .असे असताना सुद्धा या विकास कामांची खिल्ली उडवली जात आहे ,हा कागदोपत्री विकास असल्याचे बोलले जात आहे .या टीके बद्दल भाष्य करताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, विकास हा रेडिमेड नसतो त्याची सुरुवात कागदावरूनच होत असते .कुठलीही विकास प्रक्रिया सर्वप्रथम कागदावर येते ,त्यानंतर त्याचे सर्वे होतात आणि मग त्या कामाची अंमलबजावणी सुद्धा कागदाच्या शासकीय अध्यादेशाद्वारेच होते असे मत अर्जुननगर येथील कॉर्नर बैठकी प्रसंगी आमदार संजय मामा शिंदे यांनी आज व्यक्त केले.
तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना सुद्धा हा 3000 कोटीचा निधी कसा आला हे स्पष्टपणे दिसत आहे असे असताना सुद्धा विरोधक नकारात्मक प्रचार करत आहेत हे मतदारांना सुद्धा पटत नाही. जातेगाव ते टेंभुर्णी या रस्त्यासाठी मिळालेले 1246 कोटी, हॅम अंतर्गत रस्ते विकासासाठी 271 कोटी, कुगाव ते शिरसोडी या पुलाला मिळालेले 382 कोटी, डिकसळ पुलाला मिळालेले 55 कोटी ,याचबरोबर बजेट ,मुख्यमंत्री ग्राम सडक ,प्रधानमंत्री ग्राम सडक, नाबार्ड, 30 54 गट ब आदी माध्यमातून रस्ते विकासासाठी व पूल बांधणीसाठी तब्बल 2070 कोटी पेक्षा अधिक निधी मिळाला .आरोग्य च्या बाबतीत उपजिल्हा रुग्णालय, कर्मचारी वसाहत ,प्रशासकीय संकुल, करमाळा नगरपरिषद इमारत, सांस्कृतिक भवन, कुर्डूवाडी येथे ट्रामा केअर सेंटर यासाठी 150 कोटी निधी मिळाला. कुर्डूवाडी नगरपरिषद अंतर्गत झालेल्या विकास कामांसाठी 100 कोटी निधी मिळाला, दहीगाव उपसा सिंचन योजनेसाठी 116 कोटी निधी मिळाला, भूसंपादन, अल्पसंख्यांक विभाग, समाज कल्याण विभाग ,आमदार फंड, 25 15, पुनर्वसन विभाग, जलसंधारण विभाग या माध्यमातून मिळालेला निधी हा 200 कोटींपेक्षा अधिक आहे.
2009 ते 14 या कालावधीत 900 कोटी तर 2014 ते 19 या कालावधीत 1300 कोटी ची विकास कामे केल्याचे तत्कालीन आमदारांनी सांगितले .त्यांच्या या निधीपेक्षा जवळपास दुप्पट ,तिप्पट निधी 2019 ते 24 मध्ये आमदार संजयमामा शिंदे यांनी आणलेला हाच निधी विरोधकांना पचत आणि रुचत नसल्यामुळे अत्यंत खालच्या पातळीवरती आमदार संजयमामा शिंदे यांच्यावरती टीका होत असल्याबद्दल मतदारात चर्चा सुरू आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group