घरपोच कनेक्ट मुळे ग्रामीण भागातील नव उद्योजकांना संधी मिळेल…- तहसीलदार समीर माने.

करमाळा प्रतिनिधी. गणेश जयंती निम्मित घरपोच कनेक्ट ऍप चे उद्घाटन करमाळा येथील दत्त मंदिर विकास नगर परिसरात तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार मा. समीरजी माने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका संघचालक डॉ.श्रीराम परदेशी होते.
घरपोच कनेक्ट च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नवनवीन उद्योजक तयार होतील, तयार उत्पादनाला हक्काची ऑनलाईन बाजारपेठ मिळेल, अन् रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे प्रतिपादन तहसीलदार माने साहेब यांनी केले.यावेळी डॉ.परदेशी म्हणाले, उत्तम गुणवत्ता,उत्कृष्ट नियोजन यामुळे हे घरपोच कनेक्ट लवकरच लोकप्रिय होऊन ग्राहकांना समाधान देईल. स्वदेशी वस्तूंचा वापर केल्याने आपल्या गावातील,तालुक्यातील जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील महिला बचत गट लघुउद्योग युवा उद्योजक या सर्वांच्या हाताला काम मिळेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अन् भविष्यातील संधी या विषयावर मार्गदर्शन अनुलोम भाग जनसेवक संतोष बिनवडे यांनी केले.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खाद्य पदार्थ,वेगवेगळे चटणी,मसाले,लोणचे, प्रसिद्ध वस्तू, दैनंदिन जीवनातील उपयोगी वस्तू या ऍप च्या माध्यमातून मिळणार आहेत.स्वदेशीचा स्वीकार करायला लावणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांक्या जयंती दिनी, 2 ऑक्टोंबर पासून ही योजना कार्यान्वित होईल. सर्व ग्राहकांसाठी घरपोच कनेक्ट ॲप हे प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
यावेळी नरेंद्र ठाकूर सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य दीपक चव्हाण,भाजपा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, सर्वोदय प्रतिष्ठान चे सचिव अमरजित साळुंखे, बाळासाहेब नरारे, चक्रधर पाटील,शिक्षक संघटना अध्यक्ष सचिन शेळके, रासपा अध्यक्ष अंगद देवकाते, संघर्ष दयाळ, किरण नरारे,सोमनाथ मोटे आदी उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार सौरभ शिंगाडे आणि यांनी मानले.
करमाळा घरपोच कनेक्ट संपर्क- सौरभ शिंगाडे
8805193435
7387242659
अँड्रॉइड ऍप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
http://bit.ly/GharpochApp
गणपती बाप्पा मोरया…
मंगलमूर्ती मोरया…
