मराठा आरक्षणामुळे वातावरण तापले राजकिय नेत्यांना गावात प्रवेश बंदी एकच लक्ष्य मराठा आरक्षण भुमिकेवर ठाम
करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तालुक्यातील 50 गावात नेत्यांना प्रवेश बुंदी करमाळा तहसील मध्ये साखळी उपोषण सुरू करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करमाळा तहसील कार्यालय येथे 26 सप्टेंबर पासून चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे या उपोषणाला मराठा समाज व अन्य समाजाचाही प्रचंड पाठिंबा मिळत आहे एवढेच नाही तर तालुक्यातील 50 गावात राजकीय नेते मंडळींना गावांमध्ये येण्यास प्रवेश बंदी केले आहे त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र बनले आहे चुलीत गेले राजकारण नेते आणि पक्ष मराठा आरक्षण हीच आमची एक लक्ष मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांवर नेतेस गावात प्रवेश नाही असणारा मराठा समाजाने दिला असून त्याबाबतचे पत्र तहसीलदारांना दिले आहे गावावर लक्षवेधी ठिकाणे आरक्षण नाहीतर मतदान नाही राजकीय पक्षांना नेत्यांना आरक्षण मिळेपर्यंत गावात प्रवेश बंद असे आशयाची मोठी डिजिटल फलक लावण्यात आले आहे गावागावात वाडी वस्ती शहरापर्यंत आंदोलन पेटले असून मराठा समाजात प्रचंड प्रमाणात जागृती निर्माण झाली आहे आंदोलन करते आंदोलन ठाम असल्याने सरकारची कोंडी झाली आहे करमाळा तालुक्यातील आरक्षणाच्या समजणार तहसील कचेरी समोर चक्री उपोषण सुरू आहे दररोज ग्रामपंचायत ठराव निवेदने तहसीलदार यांना देण्यात येत आहे करमाळा तालुक्यातील राजपूत समाज धनगर समाज मुस्लिम समाज ब्राह्मण समाजाने या रक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे पत्रे बोरगाव खडकेवाडी जातेगाव बालेवाडी सर्व आळजापूर शेलगाव क देवीचा माळ सातोली पोटेगाव रोशे वाडी वांगी नंबर 3 ,भोसले,तरटगाव पाडळी देवळाली, खडकी, वांगी नं2 वडगाव दक्षिण तिवरे आधी चाळीसगाव आणि राजकीय पक्षांना गावात प्रवेश बंदी केली आहे 31 ऑक्टोबर रोजी अन्य समाजानेही पाठिंबा दर्शवला असून करमाळा बस स्थानक एसटी बसवर असलेल्या शासकीय जाहिरातीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर काळे पासून जोडे मारून आंदोलन केले आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या हितासाठी अन्न व पाण्याचा त्याग केला आहे. त्याच्या जीवाला काही बरं वाईट झाले तर सपुर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सरकारने वेळीच जागे होऊन याकडे लक्ष देण्याचे गरजेचे असल्याचे मत प्राध्यापक मिलिंद फंड यांनी व्यक्त केले आहे. तरी यावेळी उपस्थित असलेल्या विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यासपीठावर चालणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे.मागील चार दिवसांपासून करमाळा शहरात व तालुक्यात मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळे आंदोलने केले जात आहे. त्यामध्ये तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज सहभागी होत आहे. चार दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी करमाळ्यातही साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला आज महिलांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तर रोज वेगवेगळ्या दोन गावातील कार्यकर्ते येऊन उपोषणाला पाठिंबा देत आहेत. तर आज ब्राह्मण समाजानेही मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी आपण जरी सधन असलो. तरी आज बराचसा समाज मागासलेला आहे. त्यांना आरक्षणाची गरज आहे. आपण राजकीय व्यासपीठावर कायम दिसत असलो तरी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत इथून पुढे पुन्हा राजकीय स्टेजवर दिसणार नाही अशी भूमिका यावेळी त्यांनी जाहीर केली आहे. तर वेळोवेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना गरज भासेल त्यावेळी आपण सोबत लढत राहू असेही आश्वासन दिले आहे.
