मराठा समाजातील सर्व समाज बांधवांनी देशमुख- पाटील -सरदार -जाहगीरदार- कुणबी इत्यादी भेद न करता सर्वांशी रोटी बेटी व्यवहार करावा-बाळासाहेब मोरे
मराठा वधू- वर सूचक समिती अक्कलकोटच्या वतीने वधू वर परिचय मेळावा यशस्वीरित्या पार पडला.
त्या प्रसंगी ते बोलत होते.सोलापूर रोडवरील श्री स्वामी समर्थ सेवा आश्रम विसावा मंदिर येथे आयोजित केलेल्या मराठा वधू वर परिचय मेळाव्यासाठी 756 वर वधू -वर पालकांनी हजेरी लावली होती.मेळाव्याचे मुख्य प्रवर्तक राजेंद्र महाराज सुरवसे यांनी सर्वांचे स्वागत केले.विप्रथम छत्रपती शिवरायांच्या मूर्ती पूजनाने सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .यावेळी मराठा सोयरीचे महाराष्ट्र अध्यक्ष प्राध्यापक नागनाथ बागल मनोज जी गोरे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील तसेच अक्कलकोट मधील मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली विचार पिठावर अनुक्रमे वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिराचे महेश इंगळे, फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे राजीव माने ,प्रल्हाद जाधव ,जीवन ज्योती शिक्षण संस्थेचे नागनाथ सुरवसे, राजेराय मठाचे ऍड शरद फुटाणे ,उन्नती शिक्षण संस्थेचे शिवाजीराव पाटील, स्वामी समर्थ आश्रमाच्या अर्चना सुरवसे, वधू-वर परिचय राज्य अध्यक्ष प्राध्यापक नागनाथ बागल ,उपाध्यक्ष मनोज गोरे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील ता. अध्यक्ष राम जाधव बार्शीचे तालुकाध्यक्ष पंकज पिंगळे प्राध्यापक शिवाजी लोभे निलेश बोराडे पंढरपूरचे तालुकाध्यक्ष गणेश गवळी मुरुड चे वसंत मस्के औसा येथून सतीश काकडे व खंडेराव पाटील दक्षिण सोलापूरचे तालुकाध्यक्ष अजय पाटील प्राध्यापक सुधीर क्षिरसागर धाराशिव येथून अभिमान हंगरकर अक्कलकोटचे स्वामीराव पाटील अमर पाटील, बाबासाहेब निंबाळकर ,माजी नगरसेविका संयुक्ता जाधव, सर्जेराव ट्रस्टचे मोहन चव्हाण, मेजर -बापू सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सदर मेळाव्याचे स्वागत समितीचे सचिव स्वामीराव सुरवसे ,प्रस्ताविक उपाध्यक्ष बापूजी निंबाळकर, सूत्रसंचालन अतुल जाधव ,समुपदेशन वर्षा चव्हाण, तर आभार नारायण मोरे यांनी केले.
सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी समितीचे अनुक्रमे अमर शिंदे, तम्मा शेळके ,सुनील मोरे ,प्रकाश शिंदे, ज्योती पडवळकर, कविता खराडे, स्वामीनाथ बेंद्रे ,ऋतुराज सुरवसे, ज्योतिरादित्य सुरवसे, आदेश सुरवसे ,दीपक जाधव, प्रकाश गजाकोश आदींनी परिश्रम घेतले. यावेळी मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मराठा नेते मनोज जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा देण्यात आला .सदर मेळावा व्यवस्थित पार पडला.
