करमाळा

जयवंतराव जगताप हे सत्याने चालणारे नेते असुन सत्याचा वाली परमेश्वर भाऊंनी कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता मिळवुन सिध्द केले-संतोष काका कुलकर्णी


करमाळा प्रतिनिधी जयवंतराव जगताप हे सत्याने चालने नेते असुन अनेक संकटांवर यशस्वी मात करून त्यांनी राजकारणात अढळ स्थान प्राप्त केले असून सत्याचा वाली परमेश्वर असतो हे भाऊंनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सिध्द केले आहे असे मत अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था करमाळा तालुका अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी व्यक्त केले.करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी सचिव बाळासाहेब होशींग उपाध्यक्ष रवींद्र विद्वत कार्यवाहक निलेश गंधे व कार्यकारणी सदस्य राजेंद्र सूर्य पुजारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .याप्रसंगी उपस्थित श्री संतोष कुलकर्णी ,बाळासाहेब होसिंग, निलेश गंधे, रवींद्र विद्वत, राजेंद्र सूर्यपुजारी, मंगेश तरकसे ,अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक ,केंद्र करमाळा कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group