करमाळा

देशभक्त स्व. नामदेवराव जगताप यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध संस्थांच्यावतीने आदरांजली अर्पण

करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप यांना विविध पुण्यतिथी निमित विविध संस्थांमधे आदरांजली वाहण्यात आली . नामदेवराव जगताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जगताप गटाचे युवानेते माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप , खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप , माजी उपनगराध्यक्ष नारायण बापू जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली . कृषी उत्पन्न बाजार समिती , महात्मा गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय , सोलापूर जिल्हा मध्य सह बँक , खरेदी विक्री संघ आदी संस्थांमधे कै जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सभापती प्रा . शिवाजी बंडगर , आदिनाथचे माजी उपाध्यक्ष प्रा. शहाजीराव देशमुख , जिल्हा बँकेचे सिनियर बँक इन्स्पेक्टर अभयसिह आवटे , बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर , गटसचिवांचे समन्वयक सचिव बबनराव मेहेर , म गांधी विद्यालयाचे प्राचार्य पी ए कापले आदी सह शेतकरी , व्यापारी विविध संस्थांमधील कर्मचारी उपस्थित होते .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group