करमाळा शहर व तालुक्यात रविवार दिनांक 2 ॲागस्ट रोजी 9 कोरोना पाॅझिटीव्ह एकुण रुग्णांची संख्या 159

करमाळा प्रतिनिधी रविवार दिनांक 2 ॲागस्ट रोजी करमाळा शहरात 68 व ग्रामीण भागात 10 असे मिळुन 78 एॅंटाजीन टेस्ट घेण्यात आल्या असून यामध्ये 9 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आले असुन 69 निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे. करमाळा शहरातील कानाडगल्ली -5 यामध्ये 4 पुरुष व 1 महिला, सुमंतनगर -1महिला, श्रावणनगर -2 महिला, फंड गल्ली येथील -1महिला यांचा समावेश आहे. 2 आॅगस्ट रोजी एकुण कोरोना रूग्णांची संख़्या 9 असुन सर्वजण करमाळा शहरातील आहेत. आतापर्यंत एकुण रुग्णांची संख्या 159 झाली आहे. करमाळा शहरात कोरोना रुग्ण वाढत असून नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.

