शारीरिक शिक्षण महासंघाच्या सोलापूर जिल्हा संघटक पदी विनोद गरड यांची निवड.

करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण महासंघाच्या सोलापुर जिल्हा संघटक पदी तालुक्यातील जेऊर येथील श्री विनोद गरड यांची निवड संदिप मनोरे सर तसेच तायप्पा शेंडगे सर यांच्या नेत्तृत्वाखाली करण्यात आली आहे.
विनोद गरड हे करमाळा तालुका नुतन हँन्डबॉल असो चे तालुका सचिव तसेच इरो किड्स इंग्लिश मेडियम चे सचिव आहेत आता पर्यंत त्याच्या मार्गदशनाखाली शेकडो खेळाडु जिल्हा राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील सामन्यात यशस्वी झाले आहेत. ते स्वत: राष्ट्रीय खेळाडु आहेत त्यांच्या मार्गदशनाखाली जेऊर येथे दरवर्षी राज्यस्तरीय हँन्डबॉल स्पर्धा घेण्यात येतात त्यांच्या निवडीबद्ल तालुक्यात फटाक्याची अताषबाजी करुन स्वागत करण्यात आले
त्यांच्या निवडीबद्ल करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील तसेच जि. प अध्यक्ष अनिरुध्द कांबळे पं. स सभापती गहिनीनाथ ननवरे उपसभापती दत्ता सरडे मा. सभापती शेखर गाडे तसेच प. स सदस्य अतुल पाटील नुतन हँन्डबॉल असो चे अध्यक्ष संतोष नुस्ते सर अजित तळेकर यांनी अभिनंदन केले आहे .
