शाळा बंद शिक्षण चालू या शासनाच्या उपक्रमाअंतर्गत मुलांच्या शिक्षणासाठी सह्याद्री चित्रवाहीनीच्यावतीने टीलीमिली अभ्यासक्रम मालिकेचे प्रसारण सुरू

करमाळा प्रतिनिधी
कोरोनाच्या या संकटकाळामध्ये मुलांच्या आॅनलाईन शिक्षणात तंत्रज्ञानाची अडचणी येत असल्याने शासनाने दुरचित्रवाणीच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणासाठी टीलीमिली ही शैक्षणिक अभ्यासक्रम मालिका दि. २०जुलै ते २६ सप्टेंबर २०२० या कालावधीत सह्याद्री वाहीणीवर प्रसारित करण्याचे नियोजन केलेले आहे. त्यानुसार शाळा बंद पण अभ्यास चालु या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना घर बसल्या अभ्यासाचा आनंद घेता यावा या दृष्टीने शासनाने सुंदर अशा अभ्यासक्रम मालिकेचे प्रसारण करण्याचे ठरविले आहे.
जि.प्. प्रा. शाळा करंजे ता. करमाळा येथील सर्व विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झालेले होते
करंजे शाळेचे मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण लष्करगुरूजी यांनी पालकांनी मुलांनी कार्यक्रम मालिका कशी पहावी याबाबतचे उत्कृष्ट नियोजन कसे असावे याबाबतीत माहिती दिली सह्याद्रीवाहिणीवरील अभ्यास मालिका*
दिनांक २० जुलै ते २६ सप्टेंबर २०२० या काळातील इयत्तावार (रविवार वगळून) दैनंदिन वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल:
वेळ इयत्ता
सकाळी ७.३० ते ८.०० – आठवी
सकाळी ८.०० ते ८.३० – सातवी
सकाळी ८.३० ते ९.०० – DD चे अन्य कार्यक्रम
सकाळी ९.०० ते ९.३० -सहावी
सकाळी ९.३० ते १०.०० – पाचवी
सकाळी १०.०० ते १०.३० – चौथी
सकाळी १०.३० ते ११ – तिसरी
सकाळी ११.०० ते ११.३० – DD चे अन्य कार्यक्रम
सकाळी ११.३० ते दुपारी १२ – दुसरी
दुपारी १२ ते १२.३० – पहिली
‘सह्याद्री’ दूरदर्शनवरील ही महामालिका टाटा स्काय वर १२९९, एअरटेल वर ५४८, डिश टीवी वर १२२९, व्हिडिओकॉन d2h वर ७६९, डीडी फ्रीडिश वर ५२५ आणि हाथवे वर ५१३ या क्रमांकांच्या चॅनल्सवर बघता येईल.तरी सर्वांनी या शासनाच्या उपक़्रमात सहभागी होऊन शिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख़्याध्यापक लक्ष्मण लष्करगुरुजी यांनी केले आहे.
