आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे वडील गोविंद बापू पाटील यांचे निधन

जेउर प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेलगाव भाळवणी येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी तसेच शिवसेनेचे माजी आमदार आमदार नारायण आबा पाटील यांचे पिताश्री कर्मयोगी गोविंद बापू गंगाराम पाटील वय 92 यांचे अकलूज येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले ते गेले काही दिवसांपासून आजारी होते त्यांच्यावर अकलूज येथील इनामदार हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते त्यांच्या मागे पत्नी चार मुले तीन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी लव्हे तालुका करमाळा येथे दुपारी दिड वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी माहिती दिली कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांना साप्ताहिक पवनपुत्र परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
