दत्तकलाचे विद्यार्थी अर्णव मिंड राज खाटमोडे यांची शिष्यवृत्तीसाठी निवड.
करमाळा प्रतिनिधी
फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दत्तकला आयडियल स्कूल केत्तूर-1 च्या1) अर्णव अंबादास मिंड.5 वी
2) राज पांडुरंग खाटमोडे. 8वी या दोन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परिक्षेत अनुक्रमे इंग्रजी माध्यमातून 234 गुण व मराठी माध्यमातून 198 गुण प्राप्त करुन शिष्यवृत्ती संपादन केली आहे.अर्णव मिंड हा तालुक्यातुन इंग्रजी माध्यमाचा एकमेव विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल बोलताना प्राचार्य विजय मारकड सर यांनी सांगितले की, शाळेकडून स्कॉलरशिप, मंथन , नवोदय , या सारख्या परिक्षांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन,सराव परिक्षांवर जास्तीत जास्त भर, विद्यार्थ्यांचा नियमित अभ्यास हेच यशाचे गुपित आहे.शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक याचे कौतुक पालक वर्गाकडून करण्यात आले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणा दादा सुर्यवंशी साहेब सचिवा प्रा.माया झोळ मॅडम स्कूल डायरेक्टर प्रा. नंदा ताटे मॅडम प्राचार्य विजय मारकड सर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
