Thursday, April 24, 2025
Latest:
Uncategorized

करमाळयात सोमवारी शेतकऱ्याचा रास्ता रोको आंदोलन- सुनील बापु सावंत

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील सर्व शेतकरी च्या वतीने सुनील बापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दिनांक 13/3/2023 जामखेड बायपास चौक येथे सकाळी अकरा वाजता कांदयाला हमी भाव मिळावायासाठी अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकरी ना नुकसान भरपायी मिळावी, तसेच महागाई,गॅस दर पेट्रोल डिझेल चे दर कमी करण्यात यावे यासाठी आंदोलन करण्यात येणार असुन सर्व शेतकरी नी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सांवत यांनी केले आहे
यावेळी तहसीलदार करमाळा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,सध्या कांदयाला बाजारात दर नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे महाराष्ट्र शासनाने नाफेड ची केलेली घोषणा चे पुढे काय झाले तसेच अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकरी ना अदयाप पर्यंत मदत मिळाली नाही,तसेच सध्या प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई डिझेल पेट्रोल चे वाढलेले दर कमी करण्यात यावे यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे असे या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर सावंत गटाचे नेते सुनील बापु सावंत,बबन जाधव, मनोज गोडसे, प्रदीप हिरडे रघुनाथ झिंझाडे ,मोहन शिंदे ,सुरेश जाधव, फारुक जमादार ,नवनाथ झिंझाडे पांडुरंग शिंदे बापू उबाळे चंद्रकांत पवार आदी च्या सहया आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group