Uncategorized

करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयाचे योग पटू, योगतज्ञ प्राचार्य श्री बाळासाहेब नरारे सर यांना”योग रत्न” पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी: आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, छत्रपती संभाजीनगर येथे २२ जून २०२५ रोजी योग, आयुर्वेद, युनानी आणि नॅचरोपॅथी मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. जागतिक योगा दिनानिमित्त या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातून पाच हजार इच्छुकांनी या पुरस्कारासाठी आपले नामांकन दाखल केले होते. त्यातून निवड समितीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक व योगाचार्य यांची निवड केली होती. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील प्रख्यात योग पटू, योगतज्ञ प्राचार्य श्री बाळासाहेब नरारे सर यांची “योग रत्न” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. २०१७ पासून ते करमाळा येथे नियमितपणे आणि उपचारात्मक पद्धतीने “ध्यान योग साधना केंद्र” च्या माध्यमातून योग वर्ग घेत आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो जणांचे आरोग्य निरोगी बनवले असून अनेकांना सुदृढ जीवन जगण्याची योग कला शिकविली आहे. तसेच त्यांनी कोविड काळामध्ये कोविड रुग्णांना सुद्धा आरोग्याचे धडे दिले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पुन्हा एकदा करमाळा तालुक्याच्या नावात मानाचा तुरा रोवला आहे. श्री बाळासाहेब नरारे यांचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे…

error: Don\'t try to copy. Content is protected !!