श्री कमलाभवानी देवीच्या आरती चे 9 दिवस थेट प्रक्षेपण केल्याबद्दल संघर्ष न्यूज चैनल चे संपादक सिद्धार्थ वाघमारे यांचा सत्कार
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व तालुक्यात जेथे जेथे सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातील ते सर्व कार्यक्रम थेट प्रक्षेपण हा द्वारे करमाळा तालुक्यातील जनतेसमोर दाखवण्यासाठी संघर्ष न्यूज चैनल कटिबद्ध आहे असे प्रतिपादन संपादक सिद्धार्थ वाघमारे यांनी केले आज करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने वाघमारे यांचा सत्कार महेश चिवटे नासिर कबीर निलेश चव्हाण सचिन जव्हेरी दिनेश मडके नागेश चेंडगे अविनाश जोशी सागर गायकवाड देवीचामाळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दादा पुजारी देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक अशोक गाठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संघर्ष न्यूज चॅनेलचे संपादक सिद्धार्थ वाघमारे यांच्या चॅनेल मुळे करमाळा तालुक्यातील सर्व घडामोडी थेट जनतेपुढे जात असून कमला देवीची रोजी होणारी आरती त्यांनी लाईव्ह करून कोरणा काळात भक्तांना घरी बसून आरती पाहण्याचा योग मिळून गेला पुणे मुंबई येथे राहणाऱ्या भक्तांनी सुद्धा आरतीचे थेट प्रक्षेपण पाहून घरीच कमलादेवी चे दर्शन घेतले ही सेवा मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल सिद्धार्थ वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.
