नागेशदादा कांबळे बहूजनरत्न पूरस्काराने सन्मानित* *समविचारी बहूजन मित्र परिवाराने केलेल्या अभिष्टचिंतन सोहळयात केला प्रदान* !
*
करमाळा प्रतिनिधी -बहूजन नेते मा नागेश दादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील समविचारी बहूजन मित्र परिवाराच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर झालेल्या जाहीर कार्यक्रमात विविध समाजातील लोकांनी एकत्र येऊन 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळयाचे नियोजन केले होते.
आजपर्यंतच्या सामाजिक कारकिर्दीत नागेश दादा कांबळे यांनी जो सामाजिक सलोखा राखण्याचे जे बहुमोल काम केले आहे.गोरगरिब सर्वसामान्यांसाठि उभारलेले लढे यामुळे बहुजन चळवळीचा सन्मान वाढलेला आहे.आजपर्यंत बहुजन समाजातील कला,क्रिडा, शैक्षणिक इ क्षेत्रातील गूणवंतांचा सन्मान नागेश दादा यांनी केला आहे.समाजातील चांगल्या प्रवृत्ती वाढिस लागण्याकामी बहुजन समाजातील सक्रिय कार्यकर्ते यांचा समन्वय नेहमी ते राखून असतात, तब्बल सतरा वर्षे संविधान सन्मान रॅली काढून प्रबोधनाचे काम केले आहे.
हे कार्य मनात ठेवून बहुजन मित्र परिवाराने “बहूजनरत्न”पूरस्कार ट्रॉफी व यशकल्याणी सामाजिक संस्था परिवाराच्या वतीने मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी शहर व तालूक्यांमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी नागेशजी कांबळे यांचा सत्कार करण्यासाठी एकच गर्दी केली होती.
सत्कारादरम्यान अनेक पदाधिकारी यांनी नागेशदादा यांनी राजकीय क्षेत्रात कार्यरत होण्याची विनंती केली.
सत्काराला उत्तर देताना नागेश दादा कांबळे यांनी या पूरस्काराने कृतकृत्य झालो असून या पूरस्काराने जबाबदारी व उर्जा वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले.राजकिय दृष्टया सक्रिय होण्यासंबंधी उत्तर देताना ते म्हणाले कि येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जवळच्या कार्यकर्त्यांना निवडून आणणार असल्याचे जाहीर केले.. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये देखील कार्यकर्ते पाठवणार असल्याचे सूतोवाच नागेश कांबळे यांनी केले.
येथील आमदारकिचे समीकरण दलित समाज ठरवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यापूढिल काळात अधिक सक्रिय पणे चळवळीत कार्यरत राहणार असल्याची खात्री देखील त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष ओहोळ यांनी केले.
